नव्या कबड्डी खेळाडूंना युपी योद्धाची शिडी 

UP Yodha provides a ladder to aspiring kabaddi players

पगेल्या सहा वर्षांत प्रो कबड्डी लीगने प्रसिद्धीची अनेक शिखरे गाठली. या लीगने अनेक उदयोन्मुख खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. प्रो कबड्डीत संधी मिळाल्यावर अनेक खेळाडूंचे नशीब बदलून ते स्टार बनले.
भारताच्या वेगवेगळ्या भागांतून कबड्डी खेळाडू शोधण्यासाठी प्रो कबड्डी लीगमधील संघ अनेकदा प्रयत्नशील असतात. याचाच भाग म्हणून काही संघानी स्वतःचे उपक्रम सुरु केले आहेत. यामध्ये आता युपी योद्धा संघाची भर पडली आहे. युपी योद्धा संघाने स्वतःची कबड्डी प्रशिक्षण अकादमी सुरु केली आहे. युपी योद्धा संघाच्या सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत चाहत्यांना माहिती देण्यात आली आहे.

 

युपी योद्धा बी. के. कबड्डी अकादमी असे या अकादमीचे नाव आहे. संघाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, विविध उदयोन्मुख खेळाडूंना सर्वंकष प्रशिक्षण देत त्यांना भविष्यतील कबड्डी स्टार बनवणे या हेतूने ही अकादमी सुरु करण्यात आली आहे.
अकादमीमध्ये २०० खेळाडूंच्या प्रशिक्षणाची आणि राहण्याची व्यवस्था आहे. अकादमीमध्ये खेळाडूंसाठी आऊटडोअर रनिंग ट्रॅक,इनडोअर मॅच आणि प्रॅक्टिसची सुविधा पुरविण्यात आली आहे. याबरोबरच अद्यावयवत जिमची सुविधा असून खेळाडूंच्या राहण्यासाठी वसतिगृहाची व्यवस्था आहे. दिल्लीपासून दोन तासांच्या अंतरावर मीरत शहराच्या बाहेर ही अकादमी आहे.

 

प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या हंगामापासून युपी योद्धा संघ या स्पर्धेत खेळतो आहे. दिल्लीजवळील ग्रेटर नोएडा शहरात संघाचे मुख्यालय असून जीएमआर ग्रुपची संघावर मालकी आहे. नितेश कुमार, रिशांक देवाडिगा, मोनू गोयत, श्रीकांत जाधव सारखे प्रसिद्ध खेळाडू या संघाचा भाग आहेत.
लॉकडाऊनममध्ये युपी योद्धा कडून इंस्टाग्रामवर मॅट और मसाला चाय नावाने एक कार्यक्रम आयोजित केला जात होता. यु योद्धा संघाचे विविध खेळाडू या कार्यक्रमात या अकादमीबद्दल माहिती देत होते.  आता आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत संघाने अधिकृतरीत्या या अकादमीची घोषणा केली आहे.