परदीपची तिर्री, पवनची हॅटट्रिक की दुसराच कुणी ठरणार वरचढ?
Third one for Pardeep, Pawan's Hattrick or someone else?

प्रो कबड्डी लीगचे आजतागायत सात हंगाम पार पडले आहेत. प्रत्येक हंगामात वेगवेगळे विक्रम घडले आणि जुने मोडीत निघाले. यातल्या एका विक्रमाची अनेकदा चर्चा होताना दिसते. तो म्हणजे एकाच हंगामात सर्वाधिक रेड पॉईंट्स मिळवणारा रेडर.
आजतागायत झालेल्या सात हंगामाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर प्रत्येक हंगामात सर्वाधिक रेड पॉईंट्स मिळवणारे खेळाडू खालीलप्रमाणे आहेत.
हंगाम १ – अनुप कुमार – १५५
हंगाम २ – काशिलिंग आडके – ११४
हंगाम ३ – परदीप नरवाल – ११६
हंगाम ४ – राहुल चौधरी – १४६
Related Posts
हंगाम ५ – परदीप नरवाल – ३६९
हंगाम ६ – पवन सेहरावत – २७१
हंगाम ७ – पवन सेहरावत – ३४६
रेकॉर्डब्रेकर या नावाने प्रसिद्ध असलेला परदीप आणि हायफ्लायर पवन ह्या दोघांनी प्रत्येकी दोन हंगामात सर्वाधिक रेड पॉईंट्स मिळवण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे आता परदीप तिसऱ्यांदा हा किताब मिळवतो की पवन हॅटट्रिक करतो ह्यावर सगळ्यांचे लक्ष असेल.
परदीप आणि पवनची चर्चा असली तरी नवीन कुमार, सिद्धार्थ देसाई या दोन तरुण रेडर्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नवीनने सातव्या हंगामात ३०१ तर सिद्धार्थने २१७ रेड पॉईंट्स मिळवले होते. त्यामुळे प्रो कबड्डीच्या आगामी हंगामात सर्वाधिक रेड पॉईंट्स मिळवणारा रेडर कोण ठरणार याबद्दल चाहत्यांना उत्सुकता असेल.