हे आहेत पवन कुमारसाठी सर्वाधिक अविस्मरणीय क्षण
These Are The Most Unforgettable Moments For Pawan Kumar

प्रो कबड्डी लीगमध्ये हाय फ्लायर नावाने प्रसिद्ध असलेल्या पवन कुमार सेहरावतने नुकतेच प्रो कबड्डीमधील आपले अविस्मरणीय क्षण कोणते याबाबद्दल भाष्य केले. तो प्रो कबड्डी लीगच्या इंस्टाग्राम हँडलवरून आयोजित ‘बियॉंड द मॅट’ या लाईव्ह सत्रात बोलत होता.
यावेळी एका चाहत्याने पवनला हा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना पवन म्हणाला,
“बरेच क्षण माझ्यासाठी आवडते आहेत.मात्र अविस्मरणीय क्षण सांगायचं झाला तर पटना पायरेट्स विरुद्धच्या सामन्यातील मी मारलेली उडी मला कायम लक्षात राहील. यावेळी मला स्वतःला आपण एवढी उंच उडी मारू शकू असे वाटले नव्हते.”
“तसेच सहाव्या हंगामातील तमिळ थलायवाजविरुद्धचा सामनादेखील माझ्या कायम लक्षात राहील.या सामन्यात मी हाफ टाइमच्या आधीच २० गुण मिळवले होते.”
त्याच्या या उंच उडी मारण्याच्या क्षमतेमुळेच त्याला हाय फ्लायर हे टोपण नाव मिळाले.पवनने प्रो कबड्डीच्या सहाव्या हंगामात मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयरचा किताब जिंकला होता. सातव्या हंगामात त्याने सर्वाधिक ३६० गुण नोंदवले होते.”