कबड्डीसाठीची खरी गुणवत्ता महापालिका शाळांमध्ये – राजू भावसार

The real quality for Kabaddi in municipal schools – Raju Bhavsar

“कबड्डीसाठीची खरी गुणवत्ता ही महापालिका शाळांमध्ये आहे.” असे प्रतिपादन ज्येष्ठ कबड्डी प्रशिक्षक आणि अर्जुन पुरस्कार विजेते राजू भावसार यांनी केले. राजू भावसार यांना नुकताच ‘कॅप्टन शिवरामपंत दामले स्मृती क्रीडा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.

“महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना योग्य वेळी मदत आणि दिशा देण्याची गरज आहे. त्यांना कबड्डीत आणले तर त्यांना योग्य दिशा मिळेल.यासाठी महाराष्ट्रीय मंडळाने पुढाकार घेऊन कबड्डी स्कुल सुरू करावे.या स्कुलमध्ये विद्यार्थ्यांना कबड्डीचे प्रशिक्षण दिले जावे.” असे ते म्हणाले. अशा कबड्डी स्कुलमधून भारताला पुण्यातून चांगले कबड्डीपटू मिळू शकतील असे मत त्यांनी व्यक्त केले.

गेल्या महिन्यात भावसार यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. पंचवीस हजार रुपये रोख, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भावसार यांनी लॉकडाऊनमध्ये इन्स्टाग्राम लाईव्ह सारख्या माध्यमातून कबड्डीविषयक विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले आहे.