जयपूरच्या हवा महलने ‘सन्स ऑफ सॉइल’ ला दिली अशी अनोखी मानवंदना
That’s how Jaipur’s iconic Hawa Mahal paid tribute to Son’s of Soil’

जगभरातील कबड्डी रसिक आतुरतरने वाट पाहत असलेली डॉक्युमेंटरी ‘सन्स ऑफ द सॉईल’ नुकतीच अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाली. प्रो कबड्डी लिगमधील संघ जयपूर पिंक पँथर्सच्या प्रवासावर ही डॉक्युमेंटरी बेतली आहे. प्रदर्शित होण्याआधीपासून या डॉक्युमेंटरीच्या ट्रेलरने कबड्डी रसिकांची उत्सुकता वाढवली होती.
ही डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाल्यावर संघाच्या खेळाडूंनी आपल्या सोशल मीडियावर याबद्दल पोस्ट करुन आपल्या चाहत्यांना ही डॉक्युमेंटरी पाहण्याचे आवाहन केले. आता मात्र एका वेगळ्या कारणासाठी ही डॉक्युमेंटरी चर्चेत आली आहे. जयपूर शहरातील प्रसिद्ध हवा महलच्या प्रशासनाने एका खास कृतीतून ह्या डॉक्युमेंटरीला पाठिंबा दर्शविला आहे. हवा महलवर रोज होणाऱ्या विद्युत रोषणाईमध्ये आज ‘सन्स ऑफ द सॉईल’चाही समावेश करण्यात आला होता. गुलाबी रंगाच्या प्रकाशात हे नाव अगदी उठून दिसत होते. यातून त्यांनी जयपूर पिंक पँथर्स संघाला एक प्रकारे जणू मानवंदनाच दिली.
From the city that redefines pink to the journey of the Panthers – Hawa Mahal pays a tribute. #SonsOfTheSoil ???? pic.twitter.com/2n1kIlyv0a
— amazon prime video IN (@PrimeVideoIN) December 4, 2020
अमेझॉन प्राईमच्या ट्विटर हँडलवरून हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. जयपूर संघाचा मालक अभिषेक बच्चन याने ट्विट करत ‘ही खूप विशेष गोष्ट आहे.’ असे मत व्यक्त केले.
This is so cool. @JaipurPanthers https://t.co/P6BQw1n0sq
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) December 4, 2020