कबड्डी पंच जितेश शिरवाडकर करताय मुंबईत ज्येष्ठ नागरिकांची मदत

senior kabaddi referee Jitesh Shirvadkar help senior citizen in Mumbai during covid 19 lock down

मुंबई | सध्या करोनामुळे सबंध देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत अनेक नागरिकांना घरगुती वस्तूंची टंचाई भासत आहे.

मुंबईतील प्रभादेवी भागात राहणाऱ्या काही ज्येष्ठ नागरिकांना अशीच टंचाई होती. लॉकडाऊनमुळे कुठे बाहेरही जाता येत नव्हते.

अशा वेळी प्रो कबड्डी पंच जितेश शिरवाडकर यांनी वेळीच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पावले टाकली. त्यांनी तातडीने या नागरिकांना अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक गोष्टी पुरवल्या.

लॉकडाऊनच्या काळात अशी मदत या ज्येष्ठ नागरिकांना तातडीने पोहोचविल्यामुळे जितेश शिरवाडकर यांचे कबड्डी क्षेत्रात कौतुक केले जात आहे.

शिरवाडकर हे प्रो कबड्डी आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करतात. त्यांच्या अचूक निर्णय देण्याच्या क्षमतेचे वेळोवेळी कौतुक केले जाते.

प्रो कबड्डीच्या २०१५ च्या मोसमामध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट पंच पुरस्कार मिळाला होता.