रिशांकच्या ड्रीम ७ स्वतः रिशांकच नाही!
Rishank’s Dream 7 does not have Rishank himself

कबड्डी खेळाडू आणि त्यांची ड्रीम ७ टीम हा सध्या चर्चेचा विषय आहे. लॉकडाऊनमध्ये विविध कबड्डी खेळाडू आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत.यावेळी बऱ्याचदा चाहते खेळाडूंना त्यांची ड्रीम ७ टीम सांगण्याची विनंती करतात.
प्रो कबड्डी लीगद्वारा आयोजित ‘बियाँड द मॅट’या कार्यक्रमात आजवर काही कबड्डी खेळाडू येऊन गेले. या सर्व कबड्डी खेळाडूंना चाहत्यांनी त्यांची ड्रीम ७ टीम सांगण्याची विनंती केली.
मात्र एकाही खेळाडूने आपली ड्रीम ७ सांगितली नव्हती. रिशांक देवाडीगाने मात्र कोणतेही आढेवेढे न घेता आपली ड्रीम ७ टीम सांगितली.
रिशांकची ड्रीम ७ टीम:
Related Posts
१. अनुप कुमार – कर्णधार
२. फझल अत्राचाली – लेफ्ट कॉर्नर
३. रविंदर पहल – राईट कॉर्नर
४. विशाल माने – राईट कव्हर
५. जिवा कुमार – लेफ्ट कव्हर
६. नवीन कुमार – रेडर
७. पंकज मोहिते – रेडर
सहसा खेळाडू आपली ड्रीम टीम निवडताना स्वतःला त्यात स्थान देतात .रिशांकने मात्र आपल्या ड्रीम ७ टीममध्ये स्वतःला स्थान दिलेले नाही. रिशांकने यू मुंबाकडून खेळताना दुसऱ्या हंगामात प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद मिळवले होते.