रिशांकने उलगडले त्याच्या जर्सी नंबरचे रहस्य 

Rishank unravels the mystery behind his jersey number

भारताचा तसेच प्रो कबड्डी लिगमधील आघाडीचा कबड्डीपटू रिशांक देवाडीगाने नुकतेच आपल्या सात नंबरच्या जर्सीमागील रहस्य सांगितले. तो प्रो कबड्डी लीगच्या इन्स्टाग्राम हँडलवरून आयोजित बियाँड द मॅट’ या लाईव्ह सत्रात बोलत होता.
रिशांक कबड्डी खेळताना सात नंबरची जर्सी घालतो. त्याच्या इन्स्टाग्राम हँडलमध्येसुद्धा सात आकडा आहे. यामागे नक्की काय कारण आहे हे रिशांकने नुकतेच सांगितले.
रिशांक हा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डोचा मोठा चाहता आहे. रोनाल्डो मँचेस्टर युनायटेड क्लबकडून खेळत असल्यापासून रिशांक त्या क्लबचे सगळे सामने न चुकता पाहतो. रोनाल्डोच्या जर्सीचा नंबरही सातच असतो.याच कारणामुळे रिशांकदेखील सात नंबरची जर्सी घालतो असे त्याने सांगितले.

 

शाळेत असताना रिशांक फुटबॉलपटू होता.शाळेत फुटबॉलसोडून दुसरा खेळ खेळला जात नसल्याने रिशांक जवळपास ६-७ वर्षे फुटबॉल खेळला. रिशांकने प्रो कबड्डीत यु मुंबाकडून दुसऱ्या हंगामात विजेतेपद मिळवले होते.प्रो कबड्डीच्या तिसऱ्या हंगामात तो बेस्ट रेडर ठरला होता. सध्या तो यूपी योद्धा संघाकडून खेळतो.