रिशांक बनला लखपती…
Rishank achieves a special feat - first Maharashtrian Kabaddi player to do so

भारताचा आणि महाराष्ट्राचा आघाडीचा कब्बडी खेळाडू रिशांक देवाडीगा ह्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. रिशांकने नुकताच इन्स्टाग्रामवर एक लाख फॉलोवर्सचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा रिशांक हा महाराष्ट्राचा पहिलाच कबड्डी खेळाडू ठरला आहे.
स्वतः रिशांकने आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली आहे. रिशांकने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत याबाबत चाहत्यांचे आभार ही मानले आहेत.
लॉकडाऊनच्या काळात रिशांक सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांच्या नियमित संपर्कात राहत होता. या दरम्यान त्याने वेगवेगळ्या इन्स्टाग्राम हँडलवरून लाईव्ह सेशनद्वारे चाहत्यांशी संवादही साधला होता.
रिशांकने यू मुंबाकडून खेळताना प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामात विजेतेपद मिळवले होते. सध्या तो यूपी योद्धा संघाकडून खेळतो आहे.