तिने खेळू नये म्हणून लोकांनी मैदानात खिळे टाकले, ती मात्र…
People put nails on the field so that she would not play, but she...

बिहारच्या एका छोट्याश्या गावात वाढलेल्या शमाला पहिला विरोध घरच्यांकडूनच झाला. मुस्लिम समाजाची असल्याने मुळात कबड्डीसारखा खेळ खेळणे हेच शमासाठी एक मोठे आव्हान होते. तिच्या स्वतःच्या आजीनेच तिच्या कबड्डी खेळण्याला आधी विरोध केला. कब्बडी खेळताना शॉर्ट आणि टी शर्ट घालून ही मुलगी आपल्या घराण्याचे नाव खराब करेल असे आजीला वाटे. तिच्या चुलत्याने तर यावरही कडी करत तिला जीन्स घालून घरी यायला मनाई केली. शमाचे आईवडील फरीदा आणि इलियास मात्र खंबीरपणे आपल्या मुलीसोबत उभे राहिले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असूनही ह्या जोडप्याने मुलीला काही कमी पडू दिले नाही. वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहिले पण मुलीच्या डाएटमध्ये कसली कसर सोडली नाही.