करोनाविरुद्धच्या लढाईत पटना पायरेट्सचा हातभार
Patna Pirates contribute to the fight against Corona
सध्या संपूर्ण भारत देश करोनाशी लढा देत आहे. अनेक राज्यांमध्ये आजही करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारे आपल्या परीने ही साथ आटोक्यात आणण्यासाठी तसेच प्रादुर्भाव झालेल्या लोकांच्या उपचारासाठी प्रयत्न करत आहेत.
राज्य सरकारांना सहकार्य म्हणून अनेकांनी पुढाकार घेतला आहे.यामध्ये अनेक व्यक्ती, क्रीडा संस्था, क्रीडा संघ यांचा समावेश आहे. प्रो कबड्डी लीगमधील सर्वाधिक यशस्वी संघ असलेला पटना पायरेट्सदेखील यात मागे नाही. पटना पायरेट्स संघाने बिहार राज्य सरकारला सहकार्य करत आपले स्टेडियम करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी उपलब्ध करून दिले आहे.
याबाबतची पोस्ट पटना पायरेट्सने आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.बिहार सरकार आणि एका एनजीओ मार्फत ही सुविधा पटना पायरेट्सच्या पाटलीपुत्र स्टेडियमवर उभारण्यात आली आहे.
पटना पायरेट्सने प्रो कबड्डी लीगच्या तिसऱ्या,चौथ्या आणि पाचव्या हंगामाचे विजेतेपद मिळवले होते.