आइसमन अजय ठाकूरची ड्रीम टीम बघून धडकी भरेल!

प्रो कबड्डी लीगतर्फे बियाँड द मॅट या कार्यक्रमाचा दुसरा सिझन काल सुरू झाला. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात भारताचा माजी कर्णधार अजय ठाकूरने हजेरी लावली.

प्रो कबड्डी लीगच्या इन्स्टाग्राम हँडलवरून लाईव्ह पार पडलेल्या या कार्यक्रमात अजयने आपली ड्रीम टीम सांगितली. आश्चर्य म्हणजे आपल्या ड्रीम टीममध्ये अजयने स्वतःला जागा दिली नाही. आपल्या ड्रीम टीममध्ये असणारे खेळाडू इतके महान आहेत की आपल्याला या संघात स्थान मिळू शकत नाही अशी भावना अजयने व्यक्त केली.

अजयची ड्रीम टीम बघून खरोखरच प्रतिस्पर्धी संघाला धडकी भरेल. अशी आहे त्याची ड्रीम टीम

जोगिंदर नरवाल – कॉर्नर
अनुप कुमार – कव्हर
धर्मराज चेरलातन – कॉर्नर
राकेश कुमार – कव्हर
मनजीत चिल्लर
पंकज शिरसाठ
दिनेश कुमार