ऐकावे ते नवलच, त्याचा जर्सी नंबरच आहे त्याच्या गाडीचा नंबर
Now this is new, his jersey number is his car number too

प्रत्येकासाठी आपली गाडी ही खास असते.गाडीबरोबरच गाडीचा नंबरही खास असावा असे सगळ्यांनाच वाटत असते. काहीजण तर लाखो रुपये मोजून आपल्या गाडीसाठी स्पेशल नंबर विकत घेतात.
महाराष्ट्राचा कबड्डीपटू निलेश साळुंखे यानेही आपल्या नव्या गाडीसाठी असाच खास नंबर घेतला आहे. निलेशने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली आहे.
निलेशने नुकतीच किया सेलटॉस या गाडीची खरेदी केली. गाडीची चावी स्वीकारतानाचे फोटो त्याने शेअर केले आहेत. विशेष बाब म्हणजे या गाडीचा नंबर. निलेशच्या नव्या गाडीचा नंबर आहे एमएच ०५ इजे ०५०५. निलेश मॅटवर असताना कायम ०५ क्रमांकाची जर्सी घालतो. आता त्याने आपल्या जर्सीचाच नंबर आपल्या गाडीसाठी घेतला आहे. अनेक खेळाडू आपल्या जर्सी नंबरबाबत हळवे असतात. आपल्या गाडीचा नंबरही जर्सीचाच नंबर घेऊन निलेशने हे दाखवून दिले आहे.
निलेश सध्या जयपूर पिंकपँथर्स संघाकडून प्रो कबड्डीत खेळतो आहे. प्रो कबड्डीच्या गेल्या दोन हंगामांत आपल्या खेळाने त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.