आता बारी रोहितची – घेऊन आलाय आपली ड्रीम टीम
Now it's Rohit's turn to bring his dream team

लॉकडाऊनमध्ये प्रत्येक खेळाडू वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करून आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसतोय. प्रो कबड्डी लीगकडूनही बियाँड द मॅट नावाचा कार्यक्रम त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून आयोजित केला जातो.
या कार्यक्रमात आपल्या आवडत्या खेळाडूला चाहते अनेक प्रश्न विचारतात. त्यामध्ये तुमची ड्रीम टीम कोणती हा कदाचित सर्वात जास्त वेळा विचारला जाणारा प्रश्न असेल. खेळाडूसुद्धा त्याचे उत्तर तेवढ्याच उत्साहाने देतात.
या आठवड्यात या कार्यक्रमात बंगळुरू बुल्स संघाचा कर्णधार रोहित कुमारने उपस्थिती लावली.
यावेळी त्याने आपली ड्रीम टीम सांगितली.
अशी आहे रोहितची ड्रीम टीम
रोहित कुमार – कर्णधार
नवीन कुमार – रेडर
पवन सेहरावत – रेडर
नितेश कुमार – लेफ्ट कॉर्नर
संदीप नरवाल – राईट कॉर्नर
महेंदर सिंग – लेफ्ट कव्हर
सुरजित सिंग – राईट कव्हर