आता आली भारतीय कर्णधाराची ड्रीम टीम

Now comes the Indian captain's dream team

लॉकडाऊनमध्ये प्रत्येक खेळाडू वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करून आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसतोय. प्रो कबड्डी लीगकडूनही बियाँड द मॅट नावाचा कार्यक्रम त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून आयोजित केला जातो.

या कार्यक्रमात आपल्या आवडत्या खेळाडूला चाहते अनेक प्रश्न विचारतात. त्यामध्ये तुमची ड्रीम टीम कोणती हा कदाचित सर्वात जास्त वेळा विचारला जाणारा प्रश्न असेल. खेळाडूसुद्धा त्याचे उत्तर तेवढ्याच उत्साहाने देतात.

या आठवड्यात या कार्यक्रमात भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार दीपक हुडाने उपस्थती लावली.
यावेळी त्याने आपली ड्रीम टीम सांगितली.

अशी आहे दीपकची ड्रीम टीम

१. दीपक हुडा – कर्णधार
२. रविंदर पहल – कॉर्नर
३. सुरेंदर नाडा – कॉर्नर
४. परवेश भैन्सवाल – कव्हर
५. सुनिल मलिक – कव्हर
६. नवीन कुमार गोयत – रेडर
७. पवन सेहरावत – रेडर