परदीप,राहुल नाही तर हा आहे अनुप कुमारचा आवडता रेडर
Not Pardeep, Nor Rahul But This Player Is Anup Kumar’s Favorite Raider

प्रो कबड्डी लीगमधील यु मुंबा, जयपूर पिंक पँथर्स या संघाचा माजी कर्णधार आणि पुणेरी पलटणचा सध्याचा प्रशिक्षक अनुप कुमार याने प्रो कबड्डीमधील आपला आवडता रेडर कोण आहे हे सांगितले आहे. प्रो कबड्डी लीगच्या इन्स्टाग्राम हँडलवरून आयोजित बियाँड द मॅट या इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये अनुप बोलत होता.
यावेळी एका चाहत्याने अनुपला “प्रो कबड्डीमधील तुझा आवडता रेडर कोण?” असा प्रश्न विचारला.या प्रश्नाचे उत्तर देताना अनुप म्हणाला,
“जोपर्यंत मी खेळत होतो तोपर्यंत मीच माझा आवडता रेडर होतो.मात्र मी सोडून सर्वाधिक चांगला रेडर म्हणून मी शब्बीर बापूचे नाव घेईल.दुखापतीमुळे शब्बीर प्रो कबड्डीत फारशी चमक दाखवू शकला नाही.त्यामुळे त्याला भारताकडून खेळण्याची संधीदेखील मिळू शकली नाही.मात्र एका चांगल्या खेळाडूमध्ये आवश्यक असणारे सगळे गुण शब्बीरमध्ये होते. मॅटवर आणि मॅटबाहेरही शब्बीर एक खेळाडू म्हणून खूप चांगला होता.मात्र दुखपतींमुळे तो स्वतःला सिद्ध करू शकला नाही.”
अनुपने प्रो कबड्डीमध्ये रेडर म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली.त्याच्या नेतृत्वाखाली यू मुंबाने प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामाचे विजेतेपदही मिळवले होते. अनुपने २०१८ साली कबड्डीतून निवृत्ती घेतली.