ऑल टाइम ७ टीम सांगायला नितेशही मागे नाही
Nitesh is not far behind in announcing the All-Time 7 team

कबड्डी खेळाडू आणि त्यांची ऑल टाइम टीम हा सध्या चर्चेचा विषय आहे. लॉकडाऊनमध्ये विविध कबड्डी खेळाडू आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी बऱ्याचदा चाहते खेळाडूंना त्यांची ऑल टाइम ७ टीम सांगण्याची विनंती करतात. यामध्ये आता नितेश कुमारची भर पडली आहे.
भारताचा आघाडीचा कबड्डीपटू नीतेश कुमार याने नुकतीच आपली ऑल टाइम ७ टीम सांगितली आहे. नितेश त्याचा प्रो कबड्डीचा संघ यूपी योद्धाने आयोजित केलेल्या मॅट और मसाला चाय या इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये बोलत होता.
नितेशची ऑल टाइम ७ टीम
१. बलदेव सिंग – राईट कॉर्नर
२. सुनिल कुमार – राईट कव्हर
३.सुमित – लेफ्ट कॉर्नर
४. अमित नरवाल – लेफ्ट कव्हर
५. परदीप नरवाल – रेडर
६. अजय ठाकूर – रेडर – कर्णधार
७. नवीन कुमार – रेडर
नितेश फ्युचर कबड्डी हिरोज उपक्रमातून प्रो कबड्डीत आला होता. प्रो कबड्डीच्या सहाव्या हंगामात त्याने १०० टॅकल पॉईंट्स नोंदविण्याचा विक्रम केला होता.