मोनू गोयत म्हणतो आता माझी बारी…

Monu Goyat says now it’s my turn

करोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून कबड्डी खेळाडू विविध प्रकारे चाहत्यांशी संवाद साधत आहेत. यामध्ये प्रो कबड्डी लीगचे संघही मागे नाहीत. बरेचसे प्रो कबड्डी संघ आपल्या सोशल मीडिया हँडलवरून खेळाडू आणि चाहते यांच्यात संवाद घडवून आणत आहेत. यूपी योद्धासुध्दा आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून ‘मॅट और मसाला चाय’ या नावाने एक कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमात नुकतीच मोनू गोयत याने हजेरी लावली.

यावेळी मोनूला त्याची ड्रीम कबड्डी टीम सांगण्याची विनंती करण्यात आली. मोनूने आपली ड्रीम टीम अशी ठेवली आहे.

१.रविंदर पहल – कॉर्नर
२. सुरेंदर नाडा – कॉर्नर
३. सुनील कुमार – कव्हर
४. मनजीत चिल्लर – कव्हर
५.परदीप नरवाल – रेडर
६. नवीन कुमार – रेडर
७. मनिंदर सिंग – रेडर

मोनुने पटना पायरेट्सकडून प्रो कबड्डीचे विजेतेपद मिळवले आहे.