ऐकावं ते नवलच..कबड्डीपटूने थेट हेलिकॉप्टरमधून वधूला घरी नेले

Mind Boggling! This Kabaddi player called a helicopter to take the bride home

भारताचा प्रसिद्ध कबड्डीपटू राहुल चौधरी नुकताच विवाहबद्ध झाला. आपल्या चाहत्यांसाठी विवाहसोहळ्यातील हळद, बारात यासारखे समारंभ राहुल ने आपल्या इन्स्टाग्रामवर लाईव्ह दाखवले होते.

आता मात्र राहुल वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे.लग्नानंतर आपल्या वधूला घरी नेण्यासाठी राहुलने थेट हेलिकॉप्टर बोलावले होते. जेव्हा हे हेलिकॉप्टर राहुलच्या गावात पोहोचले तेव्हा अनेक गावकरी तिथे जमा झाले होते. त्यांनी नवविवाहित जोडप्याबरोबर फोटोदेखील काढून घेतले.

उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यातील जलालपूर या छोट्या गावात राहुल लहानाचा मोठा झाला. त्याचे वडील होमगार्ड असून शेतीदेखील करतात. आई गृहिणी आहे.

राहूलची पत्नी हेताली अहमदाबाद येथील एका उद्योगपतीची मुलगी आहे. ती स्वतः पेशाने पायलट असून इंडिगो एअरलाइन्समध्ये नोकरी करते. राहुल भारताचा आघाडीचा कबड्डीपटू असून गेल्या काही वर्षात प्रो कबड्डी लीगमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे.