महाराष्ट्राचा सुवर्णपदक विजेता खेळाडू बनलाय करोना योद्धा
Maharashtra's Gold Medal winner is now a Corona Warrior

करोनाच्या साथीमुळे सध्या देशभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यातही महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढतच आहे. अशात सरकारी यंत्रणा मोठ्या धैर्याने या संकटाशी सामना करत आहेत. मुंबई पोलीस विशेषतः यामध्ये चांगली कामगिरी करत आहेत. सध्या महाराष्ट्र पोलीस सेवेत असलेले महाराष्ट्राचे माजी कबड्डी खेळाडू अनिल पाटील हेही यात सामील आहेत.
दादर येथे असिस्टंट सब इंस्पेक्टर असलेले पाटील करोनाची साथ सुरू झाल्यापासून इमारती सिल करण्याचे काम करत आहेत. याबद्दल अधिक माहिती देताना पाटील म्हणाले,
“करोनाची साथ सुरू झाल्यापासून,जिथे जिथे करोनाचर रुग्ण आढळतील त्या इमारती सील करण्याची जबाबदारी मला दिली आहे. मी दादर, भायखळा, नागपाडा,आगरीपाडा या भागांमध्ये काम करत आहे. याबरोबरच मी लॉकडाऊन दरम्यान रस्ते सुरक्षेबाबतही काम करत आहे.”
अनिल पाटील यांनी महाराष्ट्र कबड्डी संघाकडून खेळताना वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे सुवर्णपदक मिळवले होते.प्रो कबड्डी लीगच्या तिसऱ्या हंगामात ते जयपूर पिंक पँथर्सकडून खेळले.महाराष्ट्र पोलीस दलाकडून माजी भारतीय कर्णधार पंकज शिरसाट याच्या नेतृत्वाखाली खेळताना त्यांनी ऑल इंडिया पोलीस टुर्नामेंटचे सुवर्णपदक मिळवले होते.
अनिल पाटील यांच्या या कामगिरीबद्दल प्रो कबड्डी लीगमधील संघ यु मुंबाने त्यांचा यु मुंबा हिरो म्हणून गौरव केला आहे.