कबड्डी क्षेत्रातून सुशांतसिंग राजपूतला श्रद्धांजली

Kabaddi players pay tribute to Sushant Singh Rajput

प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत याचे आज निधन झाले. त्याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या करून आपले जीवन संपवले.

सुशांतच्या निधनाने बॉलिवूड बरोबरच कबड्डी क्षेत्रातही खळबळ माजली. अनेक कबड्डी खेळाडू, पंच यांनी सोशल मोडियावर सुशांतला श्रद्धांजली अर्पण केली.यामध्ये दीपक निवास हुडा, श्रीकांत जाधव, दर्शन काडियन, संदीप धुल,महेंद्र राजपूत, सायली केरीपाळे तसेच आंतरराष्ट्रीय पंच आरती बारी यांचा समावेश आहे. सुशांतने प्रो कबड्डी लीगमध्ये काही सामान्यांना हजेरी लावली होती.