कबड्डी क्षेत्रात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
Kabaddi Players Celebrate International Yoga Day

दरवर्षी २१ जून ला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो.संयुक्त राष्ट्रांच्या २०१४ च्या बैठकीत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीतील आपल्या भाषणात २१ जून या दिवशी हा योग दिवस साजरा करावा असे सुचवले होते. हा दिवस वर्षातील सगळ्यात मोठा दिवस असल्याने जगातील अनेक देशांत या दिवसाचे वेगळे महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २०१५ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दहा रुपयांचे नाणे व्यवहारात आणले होते.
यावर्षीदेखील आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. अनेक कबड्डी खेळाडूंनी योग करत, सोशल मीडियावर पोस्ट करत योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार दीपक हुडा, नितीन तोमर, सुरजित सिंग, नीतेश कुमार, लतिका ठाकूर यांचा समावेश आहे.प्रो कबड्डी लिगमधील पटना पायरेट्स, यु मुंबा, यूपी योद्धा, गुजरात फॉर्च्युन जायंट्स,जयपूर पिंक पँथर्स,पुणेरी पलटण या संघांनी देखील योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.