कबड्डीपटूंचे टॅटू प्रेम
Kabaddi players and their love for the Tattoos

प्रो कबड्डी सुरु झाली आणि रातोरात अनेक खेळाडूंचे नशीब पालटून गेले. याआधी फारसे कुणी ओळखत नसलेल्या खेळाडूंना आता चाहते ओळखू लागले. खेळाडू जातील तिथे चाहते त्यांच्याभोवती गर्दी करू लागले.
थोडक्यात खेळाडू आता सेलेब्रिटी झाले. सेलेब्रिटी म्हटलं की मग तसे राहणे गरजेचे झाले. याआधी कधी कबड्डी खेळाडू आपली हेअरस्टाईल, आपले कपडे कपडे याकडे फारसे लक्ष देत नसत. आता मात्र चित्र वेगळे आहे. काही खेळाडू तर कपडे, हेअरस्टाईल यांच्याबरोबरच अंगावर टॅटूसुद्धा करून घेतात. या लेखातून असेच काही खेळाडू आणि त्यांचे टॅटू याबद्दल माहिती घेणार आहोत.
सुरेंदर नाडा –
कबड्डीच्या मॅटवर प्रतिस्पर्धी खेळाडूंचे अँकल होल्ड करत त्यांना अडचणीत आणण्यासाठी सुरेंदर नाडा प्रसिद्ध आहे. सीआयएसएफ मध्ये नोकरी करणाऱ्या सुरेंदरने एक अशी गोष्ट केली आहे की जिचा त्याच्या संघ सहकाऱ्यांनी विचारही केला नाही. सुरेंदरच्या शरीरावर ‘ कबड्डी’ लिहिलेले दोन टॅटू आहेत. ह्यापैकी एक त्याच्या उजव्या हातावर तर दुसरा त्याच्या मानेवर डाव्या बाजूला आहे.दोन्ही टॅटूमध्ये कबड्डी हाच शब्द का याबाबद्दल सुरेंदर सांगतो, “ज्या खेळाने मला सर्वस्व दिले तो खेळ माझ्यासाठी काय आहे हे मला या टॅटूमधून दाखवायचे आहे.”
सुरेंदरने भारताकडून २०१६ मध्ये विश्वचषक जिंकला. प्रो कबड्डीत त्याने यु मुंबाकडून विजेतेपद मिळवले होते. सध्या तो पटणा पायरेट्सकडून खेळतो.