परभणीच्या कबड्डी खेळाडूने मिळवले १००%

Kabaddi player from Parbhani scores 100%

महाराष्ट्रातील परभणी येथील राष्ट्रीय पातळीवरील कबड्डी खेळाडू सिद्धी शर्मा हिने दहावीच्या परीक्षेत १००% मिळवले आहेत. सिध्दीने २०१९ च्या खेलो इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता.
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले. परभणी जिल्ह्यातील देवनांद्रा येथील माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या सिध्दीने या परीक्षेत १००% गुण मिळवले. सिद्धीच्या वडिलांचा स्वतःचा व्यवसाय आहे. आपल्या मुलीच्या यशाबद्दल ते म्हणाले,
“मी स्वतः टीव्हीवर प्रो कबड्डीचे सामने बघत असे. यातूनच सिद्धीला कबड्डीची गोडी लागली. तिने खेळ आणि अभ्यास यांचा योग्य ताळमेळ साधत दहावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवले आहे.”
आपल्या यशाबदल सिद्धी म्हणाली,
“कबड्डी खेळल्यामुळे मला मानसिक शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे सोपे गेले. त्यामुळे मला अभ्यास करणेही सोपे गेले. माझ्या मित्रमैत्रिणींना बोर्डाच्या परीक्षेचे टेन्शन असताना मला मात्र रोजच्या चार तासांच्या सरावाची टेन्शन कमी करण्यात मदत झाली. दहावीत असूनही मी यावर्षात विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.”
सिद्धीच्या यशाबद्दल शिव छत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक मंगल पांडे म्हणाले, “अभ्यास आणि खेळाचा ताळमेळ साधत यश कसे मिळवता येते याचे सिद्धी हे उत्तम उदाहरण आहे. ग्रामीण भागातील पालकांनी हे उदाहरण लक्षात ठेवून आपल्या मुलांना खेळात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच प्रशिक्षकांनी मुलांना सतत अभ्यासाबाबत चौकशी केली पाहिजे.” पांडे हे महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे खजिनदारदेखील आहेत.