कबड्डीचे चाहते ऋषी कपूर यांचे निधन

Kabaddi fan Rishi Kapoor passes away

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांचे आज मुंबईत निधन झाले. त्यांनी मुंबईतील एच एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गेल्या एक आठवड्यापासून उपचार सुरु होते. अमेरिकेत कॅन्सरवर जवळपास वर्षभर उपचार घेऊन ते गेल्या वर्षी मुंबईत परतले होते. मात्र आपल्याला बरे होण्यासाठी काही काळ जावा लागेल असे त्यांनी सांगितले होते.
ऋषी कपूर हे कबड्डीचे चाहते होते. प्रो कबड्डी लीगमधील संघ जयपूर पिंकपँथर्सचे संघमालक अभिषेक बच्चन तसेच यूमुंबाचे मालक रॉनी स्क्रूवाला यांच्याशी त्यांचे जवळचे नाते होते. ते अनेकदा या दोन संघांचे सामने पाहण्यासाठी मैदानावर उपस्थित असत.
ऋषी कपूर यांच्या निधनाची वार्ता आल्यानंतर कबड्डी क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात आली. अनेक कबड्डी खेळाडू आणि संघमालकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
यामध्ये रॉनी स्क्रूवाला, अक्षय कुमार, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष गजानन किर्तीकर, स्टार स्पोर्ट्सच्या केतकी गोलटकर, दीपक निवास हुडा, पवनसिंग सेहरावत, नवीन कुमार यांचा समावेश आहे.