महाराष्ट्रात कबड्डी दिन साजरा

Kabaddi Day celebrated across Maharashtra in a quite manner amid corona virus pandemic

दरवर्षी १५ जुलै हा दिवस महाराष्ट्रात कबड्डी दिन म्हणून साजरा केला जातो. ‘कबड्डीमहर्षी’ म्हणून गौरविलेले शंकरराव साळवी म्हणजेच बुवा साळवी यांचा हा जन्मदिवस.महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेशी संलग्न असलेल्या जिल्हा कबड्डी संघटनादेखील गेल्या २० वर्षांपासून या हा दिवस साजरा करत आल्या आहेत. यंदा मात्र राज्यात पसरलेल्या करोनाच्या साथीमुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा कायर्क्रम साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष खासदार गजानन किर्तीकर यांनी कबड्डी दिनाचे निमित्त साधून बुवा साळवी यांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त केला. तसेच कबड्डी खेळाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असू असा विश्वास व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व जिल्हा संघटनांनी साधेपणाने कबड्डी दिन साजरा केला. यामध्ये सातारा जिल्हा कबड्डी संघटना, नाशिक जिल्हा कबड्डी संघटना यांचा समावेश आहे.

अनेक खेळाडू आणि पंचांनीदेखील सोशल मीडियावर कबड्डी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यामध्ये रिशांक देवाडीगा, विशाल माने, पंकज मोहिते, ऋतुराज कोरावी, सायली केरीपाळे, सुशांत साइल, महेंद्र राजपूत, आंतरराष्ट्रीय महिला पंच आरती बारी यांचा समावेश आहे.