कबड्डी  प्रशिक्षक राजू भावसार यांना पुरस्कार 

Kabaddi coach Raju Bhavsar receives award

पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने दिला जाणारा कॅप्टन शिवरामपंत दामले पुरस्कार कबड्डी प्रशिक्षक राजू भावसार यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्रीय मंडळाकडून दरवर्षी क्रीडा, व्यायाम, सैनिकी आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. संस्थेकडून १९९८ पासून हे पुरस्कार दिले जात आहेत.
अर्जुन भावसार हे भारतीय कबड्डी संघाचे माजी खेळाडू आहेत. बीजिंग येथे १९९० साली झालेल्या ९ व्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय कबड्डी संघाचे ते सदस्य होते. कबड्डीतील त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारकडून त्यांना १९९६ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनानेसुद्धा त्यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविले आहे. सध्या ते एअर इंडियाच्या सेवेत आहेत. भावसार यांनी महाराष्ट्र महिला संघाचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. प्रो कबड्डी लीग सारख्या विविध स्पर्धांमध्ये ते कबड्डी तज्ञ म्हणून उपस्थित असतात. करोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्येही त्यांनी कबड्डी खेळाडूंसाठी प्रशिक्षणात्मक वेबिनार सारखे उपक्रम राबवले.
२५ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख अजून जाहीर झालेली नाही.