जोगिंदरची एक युक्ती आणि नवीन बनला रेकॉर्ड ब्रेकर
Joginder’s One Advise Did Wonders For Naveen

दबंग दिल्लीचा तरुण खेळाडू नवीन कुमारने प्रो कबड्डीच्या आपल्या दुसऱ्याच हंगामात आपल्या जोरदार खेळाने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केले होते. नवीनच्या ह्या जोरदार प्रदर्शनात मात्र दबंग दिल्लीचा कर्णधार जोगिंदर नरवालची भूमिका अतिशय महत्वाची ठरली होती. नवीनने स्वतः याबाबत कबुली दिली. तो प्रोकबड्डी लीगच्या इंस्टाग्राम हँडलवरून आयोजित ‘बियॉंड द मॅट’ या लाईव्ह सत्रात बोलत होता.
यावेळी बोलताना नवीन म्हणाला,
“जोगिंदर भाई मला नेहमीच पाठींबा देत. तू किती गुण घेतलेस किंवा तुझी सतत पकड का झाली याचा विचार न करता खेळ असे त्यांनी मला सांगितले. त्यांचा एक साधा नियम होता. जे झाले ते विसरून पुढच्या रेडवर लक्ष केंद्रित करायचे. मनात कसलाही विचार न ठेवता माझा आक्रमक खेळ खेळत रहायचा.”
Related Posts
“त्यांचे नुसते मॅटवर असणे मला शांत करण्यासाठी पुरेसे असे. त्यांनी सतत माझा आत्मविश्वास वाढवला आणि मला पाठिंबा दिला. माझ्यासाठी ते एक प्रेरणादायक व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या आणि माझ्या वयात बरेच अंतर असले तरी त्यांनी मला लहान भावाप्रमाणे वागवले.”
जोगिंदरकडून मिळालेल्या ह्या अविरत पाठिंब्याच्या जोरावरच नवीनने सलग २१ सुपर टेन नोंदविले आणि एका हंगामात ३०० रेड पॉईंट्स नोंदविणारा केवळ तिसरा खेळाडू ठरला.