असा पोहोचला नवीन प्रो कब्बडीमध्ये
Here’s How Naveen’s Journey Unfolded In The Pro Kabaddi League

वीसवर्षीय नवीन कुमारने प्रो कबड्डीच्या आपल्या पहिल्याच हंगामात जोरदार कामगिरी करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. दुसऱ्या हंगामात त्याने आपला धडाका सुरू ठेवत ३०० रेड पॉईंट नोंदविणारा सर्वात युवा खेळाडू होण्याचा मान मिळवला.
प्रो कबड्डीत आपण कसे पोहोचलो याबद्दल नवीनने नुकतेच भाष्य केले. तो प्रो कबड्डी लीगच्या इन्स्टाग्राम हँडलवरून आयोजित ‘बीयाँड द मॅट’या लाईव्ह सेशनमध्ये बोलत होता.
यावेळी बोलताना नवीन म्हणाला,
“मी प्रो कबड्डीच्या फ्युचर कबड्डी हिरोज या उपक्रमात सहभागी झालो होतो.या उपक्रमांतर्गत भारतभरातून तरुण कबड्डी खेळाडूंना शोधले जाते.या उपक्रमातीच्या आयोजकांनी मला ओरिसा येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत खेळताना पाहिले होते. या स्पर्धेत माझ्या संघाने सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर काही दिवसांनी मला फोन आला आणि मला मुंबईमध्ये एक महिन्याच्या प्रशिक्षण वर्गासाठी बोलावले गेले.या प्रशिक्षण वर्गात मला माझे कच्चे दुवे कळले आणि त्यामध्ये सुधारणा करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर मला प्रो कबड्डीच्या लिलावात संधी देण्यात आली.”
नवीन बरोबरच नितेश कुमार, सुरेंदर सिंग हे सुद्धा ह्याच उपक्रमातून पुढे येऊन प्रो कबड्डीत खेळले.