म्हणून अजय सगळ्यांचा आवडता – रोहितने उधळली स्तुतीसुमने
Here is why Ajay is everyone's favorite - Rohit showers praise

भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार अजय ठाकूर याची लोकप्रियता सर्वांनाच ठाऊक आहे. सबंध भारतात आणि भारताबाहेरही अजयच्या खेळाचे आणि त्याच्या नेतृत्वशैलीचे चाहते असल्याचे पहायला मिळते. अजयची ही लोकप्रियता फक्त चाहत्यांपुरतीच सीमित नाहीये. भारताच्या अनेक खेळाडूंनादेखील अजय ठाकूर हा कर्णधार म्हणून आवडतो. प्रो कबड्डी लीगद्वारा आयोजित ‘बियॉंड द मॅट’ या कार्यक्रमात नुकतीच याची प्रचिती आली.
बियॉंड द मॅटचा शेवटचा एपिसोड नुकताच पार पडला. बंगळुरू बुल्सचा कर्णधार रोहित कुमार याने या एपिसोडसाठी शोवर उपस्थिती लावली होती. यावेळी रोहितला “प्रो कबड्डी लीगमधील तुझा आवडता कर्णधार कोण?” असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर रोहितने फारसा वेळ न घालवता लगेचच अजय ठाकूरचे नाव घेतले. रोहितचे उत्तर ऐकून या शोचा सूत्रसंचालक आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला,
“या शोवर तुझ्या आधी आलेल्या मनिंदर सिंग, पवन सेहरावत, दीपक हुडा या सगळ्यांनी अजयचेच नाव घेतले होते? असे काय कारण आहे की तुम्हा सगळ्यांना अजयच कर्णधार म्हणून आवडतो?”
Related Posts
या प्रश्नाचे उत्तर देताना रोहित म्हणाला,
“मी अजयबरोबर बराच काळ कबड्डी खेळलो. तो गेली अनेक वर्षे भारताकडून खेळतो आहे. संघातील खेळाडूंना एकत्र आणण्याची त्याची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. अजय अतिशय शांत माणूस आहे. तो कधीही कुणावरही रागावत नाही. अनुभवी खेळाडू असो वा नवा खेळाडू, अजय सगळ्यांनाच सामान वागणूक देतो. अजय हा एक आदर्श कर्णधार कसा असावा याचे उत्तम उदाहण आहे.”
रोहितच्या नेतृत्वाखाली बंगळुरू बुल्सने प्रो कबड्डीच्या सहाव्या हंगामाचे विजेतेपद मिळवले होते.