म्हणून परदीपच्या ड्रीम टीममध्ये होता एकच कॉर्नर

Here is the reason why Pardeep's Dream 7 did not have a right corner

रेकॉर्डब्रेकर परदीप नरवाल याने काही दिवसांपूर्वी आपली ड्रीम ७ टीम सांगितली होती. प्रो कबड्डी लीगच्या इंस्टाग्राम हँडलवरून आयोजित ‘बियॉंड द मॅट’ या लाईव्ह सत्रात बोलत होता.

परदीपच्या या टीममध्ये ४ अजय ठाकूर, पवन सेहरावत, नवीन कुमार, स्वतः परदीप हे चार रेडर म्हणून समाविष्ट होते. याबरोबर परवेश भैंसवाल राईट कव्हर म्हणून तर सुनील कुमार लेफ्ट कव्हर म्हणून होते परदीपने सुरेंदर नाडाचा समावेश लेफ्ट कॉर्नर म्हणून केला होता. राईट कॉर्नर म्हणून कुणाचे नाव सांगावे असा विचार परदीप करत असतानाच त्याला संघातील सात खेळाडू पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. चार रेडरचा संघात समावेश केल्याने परदीपच्या संघात राईट कॉर्नरची जागा रिकामीच राहिली.

यावेळी अनेक चाहत्यांनी परदीपने निवडलेल्या या ड्रीम टीमबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. प्रो कबड्डी लीगच्या इंस्टाग्राम हँडलवरील पोस्टवर चाहत्यांनी राईट कॉर्नरला कोण खेळणार असे प्रश्न विचारले होते. या प्रश्नाला पवन सेहरावतने “मी खेळणार” अशी कॉमेंट करत उत्तर दिले होते. गेल्या आठवड्यात ‘बियॉंड द मॅट’ वर्व बोलताना पवनने याबाबत आणखी खुलासा केला.
Image: instagram/prokabaddi

 

 

 

 

 

 

 

पवनने आपल्या कबड्डी कारकिर्दीची सुरुवात राईट कॉर्नर म्हणून केली होती. अगदी प्रो कबड्डी लीगमध्ये देखील तो एक राईट कॉर्नर म्हणूनच आला होता. भारतीय रेल्वेच्या संघातही त्याची निवड राईट कॉर्नर म्हणून झाली होती. त्यामुळे परदीपच्या संघात राईट कॉर्नर नसला तरी त्या जागी मी खेळू शकतो असे पवनने चाहत्यांना सांगितले. पवनच्या या स्पष्टीकरणामुळे परदीपच्या ड्रीम ७ मध्ये राईट कॉर्नर का नव्हता याची उकल चाहत्यांना झाली.