कबड्डी खेळाडूंसाठी सुवर्णसंधी – पालघर कबड्डीकडून वेबिनारचे आयोजन
Golden Opportunity for Kabaddi Players – Palghar Kabaddi hosting webinar series
महाराष्ट्रातील पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनने कबड्डी खेळाडूंसाठी एका वेबिनार मालिकेचे आयोजन केले आहे. आधुनिक कबड्डी विषयाला केंद्रस्थानी ठेवून खेळातील गती, तंत्र यावर या वेबिनार मालिकेमध्ये भर दिला जाईल. या मालिकेतील ‘ स्ट्रेंग्थ अँड कंडीशनिंग ‘ विषयावरील पहिला वेबिनार २ ऑगस्ट रोजी दुपारी ४:३० वाजता पार पडणार आहे. या वेबिनारमध्ये महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या तसेच प्रो कब्बडी समालोचक सौ.गौतमी राऊत आरोसकर आणि स्ट्रेंग्थ अँड कंडीशनिंग कोच अमोघ पंडित हे मार्गदर्शन करणार आहेत.