माजी कबड्डी खेळाडू कृष्णा दादू पाटील यांचा सन्मान
Former Kabaddi player Krishna Dadu Patil honored

माजी कबड्डी खेळाडू आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष कृष्णा दादू पाटील यांचा नुकताच करोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.ते ठाणे महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवकही आहेत.
करोना महामारीमध्ये पाटील यांनी महापालिकेच्या माध्यमातून ठाण्यातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत.करोनाबाबत नागरिकांना वेळोवेळी मार्गदर्शन, गरजू नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप, प्रभागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन याचा यात समावेश आहे.या कार्यासाठी दैनिक महाराष्ट्र सम्राट कडून त्यांचा करोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला आहे.

पाटील हे नव्वदच्या दशकातील कबड्डी खेळाडू असून ते मावळी मंडळ, आनंद स्मृती यांसारख्या संघाकडून खेळले. त्यांनी ठाणे जिल्ह्याचेसुद्धा प्रतिनिधीत्व केले आहे. महा कबड्डी लीग मधील ठाणे टायगर संघाचे ते मालक होते. ठाणे महानगपालिकेत २०१७ पासून ते नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत.