स्वातंत्र्यदिन साजरा करा यू मुंबासोबत
Celebrate Independence Day with U Mumba

१५ ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्यदिन. दरवर्षी भारतातील आणि भारताबाहेरील भारतीय नागरिक देशाचा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा करतात. यावेळी मात्र करोनामुळे स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहावर काहीसे विरजण पडले आहे.
असे असले तरी या निमित्ताने कबड्डी चाहत्यांसाठी एक नामी संधी आहे. प्रो कबड्डी लीगमधील संघ यू मुंबाने आपल्या चाहत्यांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे.
आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करत यू मुंबाने आपल्या चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे. यू मुंबाच्या चाहते स्वातंत्र्यदिन आपल्या आवडत्या संघासोबत साजरा करू शकणार आहेत. चाहत्यांना फक्त हे करायचे आहे. आपल्या मोबाईलमध्ये आपला पाच सेकंदाचा व्हिडीओ शूट करून तो यू मुंबाने दिलेल्या [email protected] या ईमेल आयडी वर पाठवायचा आहे.तुमच्याकडे यू मुंबाची जर्सी असल्यास ती घालून हा व्हिडीओ शूट करायचा आहे. आपला व्हिडिओ १० ऑगस्ट २०२० पर्यंत पाठवायचा आहे.
चाहत्यांनी पाठवलेल्या या व्हिडीओजचे यू मुंबा नक्की काय करणार हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.