कुणी माझा फेसबुकशी संपर्क करून देईल का? – राहुल चौधरी
Can Anyone Help Me Get In Touch With Facebook Asks Rahul Chaudhary

भारताचा स्टार रेडर राहुल चौधरी सोशल नेटवर्किंग साईट्स वर बराच सक्रिय असतो. फेसबुक, इंस्टाग्राम, टिक टॉक अशा माध्यमांतून तो आपल्या चाहत्यांशी संपर्कात असतो. करोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये राहुलने इंस्टाग्राम आणि फेसबुकवरून बरेच लाईव्ह सेशन करून चाहत्यांशी संवाद साधला होता. मात्र आता राहुलचे फेसबुक अकाउंटच हॅक झाले आहे.
स्वतः राहुलने याबाबत माहिती दिली. राहुलने आपल्या इंस्टाग्रामवर स्टोरी टाकत चाहत्यांकडून मदत मागितली आहे. “माझे फेसबुक पेज हॅक झाले आहे. कुणी मला फेसबुक इंडियाच्या लोकांशी संपर्क करण्यास मदत करू शकेल का?” अशी स्टोरी राहुलने आपल्या इंस्टाग्राम पेजवर टाकली आहे.
राहुल त्याच्या रनिंग हँड टचमुळे प्रसिद्ध आहे. प्रोकबडी लीगमध्ये १००० हुन अधिक गुण नोंदविणारा तो केवळ दुसरा खेळाडू आहे.