ब्रेकिंग! प्रो कबड्डी आता नसणार विवो प्रो कबड्डी लीग

Breaking! Pro Kabaddi will no longer be the Vivo Pro Kabaddi League

देशातील सर्वाधिक लोकप्रिय लीग आयपीएलचे प्रायोजकत्व सोडावे लागल्यानंतर विवो या चिनी कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएल पाठोपाठ आता प्रो कबड्डी लीगचे प्रायोजकत्वसुद्धा विवो सोडणार आहे.

इकॉनॉमिक टाइम्स ने दिलेल्या वृत्तानुसार, या निर्णयाशी संबंधीत एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, “भारत चीन प्रश्नामुळे विवो या ब्रँडची प्रतिमा बरीच डागाळली आहे. याचा विचार करून कंपनीने किमान एका वर्षासाठी सर्व मोठ्या डीलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी आता ग्राहकांना अधिकाधिक सवलत देऊन आपली उत्पादने विकण्याचा प्रयत्न करेल.”

विवो ने आपल्या निर्णयाची माहिती स्टार इंडियालासुद्धा दिली आहे. विवो आणि स्टार इंडिया यांच्यात प्रो कबड्डी लीगच्या प्रयोजकत्वासाठी पाच वर्षांचा ३०० कोटींचा करार होता.