मैत्रीसाठी काही पण… श्रीकांतचा मित्र आहे याचंच उदाहरण
Anything For Friendship… Shrikant’s Friend Proves With An Example

खेळाडू आणि त्यांचे चाहते यांचं नातं काही नवीन नाही. आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी किंवा त्याच्याबरोबर एखादा फोटो काढण्यासाठी वाटेल ते करण्याची चाहत्यांची तयारी असते. काही चाहते आपल्या आवडत्या खेळाडूला खुश करण्यासाठी याहूनही पुढची पायरी गाठतात. मैत्रीसाठी काही पण असं आपण अनेकदा ऐकतो, बोलतो. भारतीय रेल्वेचा आघाडीचा कबड्डीपटू श्रीकांत जाधव याला मात्र हे अनुभवायला मिळाले.
Related Posts
श्रीकांतचा मित्र घनश्याम आंभोरे पाटील याने आपला मित्र श्रीकांतचा चेहरा आपल्या हातावर टॅटू करून घेतला आहे. श्रीकांतने याबाबत इंस्टाग्रामवर पोस्ट करत चाहत्यांना माहिती दिली आहे. श्रीकांत म्हणतो,
“तुमच्या अवतीभोवती अनेक लोक असतात. मात्र ते सगळे सारखे नसतात. काहीजण खास असतात. माझा भाऊ आणि खास मित्र घनश्याम आंभोरे पाटील याने त्याच्या शरीरावर माझा टॅटू केला आहे. ही गोष्ट आमच्या दोघांमधली जवळीक दाखवते. आपल्यासाठी कुणीतरी असं काही करतंय ही भावना खास आहे.”
श्रीकांतने ६७ व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत रेल्वेकडून जेतेपद मिळवले होते. प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात युपी योद्धाकडून त्याने सर्वात जास्त १५२ गुण मिळवले होते. प्रो कबड्डीच्या पाचव्या हंगामापासून श्रीकांतने आपल्या सातत्यपूर्ण खेळाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.