या खास कारणासाठी अनुप कुमार करतोय पुशअप्स

भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार, अर्जुन पुरस्कार विजेता अनुप कुमारने एक अनोखे चॅलेंज घेतले आहे. आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर अनुपने याबाबतचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

भारतीय महिला हॉकी संघाने हे चॅलेंज सुरू केले आहे.याअंतर्गत १००० गरीब कुटुंबासाठी निधी उभरण्यात येणार आहे.भारतीय हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या चॅलेंज बाबत माहिती दिली होती. कोणताही व्यायाम प्रकार करून पुढे दहा जणांना हे चॅलेंज स्वीकारण्याकरता सुचवायचे आणि शंभर रुपये देणगी द्यायची असे या चॅलेंजचे स्वरूप आहे.

अनुपला हे चॅलेंज जोसेफिन सिक्वरा यांनी दिले होते.अनुपने या चॅलेंजचा भाग म्हणून १० सेकंदात १५ पुशअप्स मारले. यानंतर अनुपने अजय ठाकूर, राकेश कुमार, जोगिंदर नरवाल, मोहित चिल्लर यांना हे चॅलेंज दिले आहे. आता हे चार खेळाडू अनुपचे हे चॅलेंज स्वीकारतात का आणि ते कोणते व्यायामप्रकार करणार याकडे कबड्डीप्रेमींचे लक्ष लागून राहिले आहे.