कुणाच्या फारसा लक्षात न आलेला परदीपचा आणखी एक विक्रम

Another Pardeep record that no one noticed much

परदीप नरवाल आणि प्रो कबड्डी लीगमधील विक्रम हे समीकरण तसे जुनेच आहे. आपल्या तुफानी रेड्सने परदीपने वेळोवेळो प्रतिस्पर्धी संघाना घाम फोडला आहे. परदीपने आजतागायत प्रो कबड्डी लीगमधील अनेक विक्रम नोंदवत स्वतःला रेकॉर्ड ब्रेकर असे नाव कमावले आहे.

मात्र या अनेक विक्रमांसोबतच परदीपने केलेला आणखी एक विक्रम फारसा कुणाच्या लक्षात आलेला नाही. परदीपने प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामात पटना पायरेट्स संघाकडून पदार्पण केले. तेव्हापासून ते आजतागायत तो याच संघाकडून खेळला आहे. पटना पायरेट्सने मिळवलेल्या प्रो कबड्डीच्या सलग तीन विजेतेपदांमध्ये परदीप एक महत्वाचा घटक होता. परदीपने या तीन हंगामात एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. प्रो कबड्डी लीगच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या हंगामाच्या अंतिम सामन्यांत पटना पायरेट्स संघाकडून सुरवातीच्या सात खेळाडूंमध्ये समावेश असलेला परदीप हा एकमेव खेळाडू आहे. राजेश मोंडल हा तिसऱ्या आणि चौथ्या हंगामाच्या अंतिम फेरीत पटना पायरेट्सकडून खेळला. मात्र तिसऱ्या हंगामाच्या अंतिम फेरीत तो राखीव खेळाडू म्हणून मैदानात आला होता.

परदीपने पटना पायरेट्सकडून अनेक विक्रम केले असले तरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिसऱ्या हंगामाच्या अंतिम फेरीत त्याने शून्य गुण नोंदवले होते. पुढच्या दोन्ही अंतिम फेरीच्या सामन्यांत मात्र त्याने अनुक्रमे १६ आणि १९ गुण मिळवत तिसऱ्या हंगामाच्या अंतिम फेरीची कसर भरून काढली होती. आता आगामी आठव्या हंगामात परदीप कशी कामगिरी करतो याकडे सगळ्यांचेच लक्ष असेल.