आणि रोहितचे यू मुंबाकडून खेळण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले…

And Rohit’s dream of playing for U Mumba remained a dream only

बंगळुरू बुल्सचा कर्णधार रोहित कुमार तिसऱ्या हंगामापासून प्रो कबड्डीमध्ये खेळतो आहे. तिसऱ्या हंगामात पटना पायरेट्सकडून त्याने विजेतेपद मिळवले.त्यांनतर चौथ्या हंगामापासून तो बंगळुरू बुल्स संघाकडून खेळतोय. त्याच्या नेतृत्वाखाली बंगळुरू बुल्सने सहाव्या हंगामाचे विजेतेपद मिळवले होते. असे असले तरी पटना किंवा बंगळुरू हे रोहितच्या पहिल्या पसंतीचे संघ नव्हते. स्वतः रोहितने याबाबत माहिती दिली. तो प्रो कबड्डी लीगने आयोजित ‘बियाँड द मॅट’ या इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनमध्ये तो बोलत होता.

यावेळी बोलताना रोहित म्हणाला,

“मला लहानपणापासून मुंबईचे आकर्षण होते.त्यामुळे प्रो कबड्डी सुरू झाली आणि त्यात मुंबईचा संघ असणार हे मला समजले तेव्हापासून माझी याच संघांसाठी खेळण्याची इच्छा होती. विशेष म्हणजे यू मुंबाने लिलावात माझी निवड केली.त्यामुळे मी खूश होतो.”

रोहित त्यावेळी भारतीय नौदलात नोकरी करत होता. प्रो कबड्डीमध्ये आपल्या खेळाडूंना सहभागी होण्यास सेनादलाने मनाई केली. त्यामुळे आपल्या आवडत्या संघाकडून खेळण्याचे रोहितचे स्वप्न स्वप्नच राहिले.

पुढे प्रो कबड्डीच्या तिसऱ्या हंगामापासून सेनादलाने आपल्या खेळाडूंना प्रो कबड्डीत खेळण्याची परवानगी दिली आणि प्रो कबड्डीत खेळण्याची रोहितची इच्छा पूर्ण झाली.