अजय – खेळाडू म्हणूनच नाही तर माणूस म्हणूनही मोठा 

Ajay Is Not Just A Great Player But A Great Human Being Too

क्रीडापटू आणि चाहत्यांचे त्यांच्यावरील प्रेम हा कायमच चर्चेचा मुद्दा असतो. आपल्या लाडक्या क्रीडापटूला खुश करण्यासाठी चाहते वाटेल ते करण्यास तयार असतात. कधी आपल्या शरीरावर टॅटू काढून तर कधी आवडत्या क्रीडापटूचे चित्र रेखाटून. भारताचा माजी कर्णधार अजय ठाकूर याला कायमच चाहत्यांचे प्रेम लाभले आहे. अजयदेखील मनसोक्तपणे आपल्या चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार करताना दिसतो. आतासुद्धा अजयने अशाच एका चाहत्याच्या प्रेमाचा स्वीकार केला आहे.
वत्सल तिवारीनामक अजयच्या चाहत्याने नुकतेच अजयचे पोलिसांच्या गणवेशातील चित्र रेखाटले. चित्र पूर्ण झाल्यावर वत्सलने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर ह्या चित्राचे फोटो अपलोड केले. अर्थातच त्याने अजयला या फोटोमध्ये टॅग केले होते. अजयला हे चित्र नजरेस पडल्यावर त्याने खुश होत स्वतःच्या इंस्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत. एवढ्यावरच न थांबता त्याने वत्सलचे मनापासून आभार मानले आहेत.
आपल्या लाडक्या खेळाडूने आपण काढलेल्या चित्राचे केलेले कौतुक पाहून वत्सल हरखून गेला. आपल्या चित्राचे कौतुक केल्याबद्दल त्याने अजयचे आभार मानले. अजयने अपलोड केलेल्या ह्या फोटोला आघाडीच्या कबड्डी खेळाडूंनी लाईक केले आहे. वत्सलने काढलेले चित्र आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करत अजयने आपल्या चाहत्याच्या प्रेमाचा स्वीकार केला आहे. या छोट्याश्या कृतीने आपण खेळाडू म्हणून मोठे तर आहोतच मात्र माणूस म्हणूनही मोठे आहोत हे अजयने दाखवून दिले.