सहा वर्षांच्या लढ्यानंतर अखेरीस या कबड्डी खेळाडूला मिळाला न्याय
After six years of fighting, this Kabaddi player finally got justice

हरयाणा सरकारने कब्बडी खेळाडू कविता देवी आणि कुस्तीपटू बबिता फोगट यांची क्रीडा आणि युवा कार्यक्रम विभागाच्या उपसंचालकपदी नेमणूक केली आहे. कविता आणि बबिता या दोघींनी या नियुक्तीबाबत कोर्टात दाद मागितली होती.
दक्षिण कोरियामध्ये २०१४ साली झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या भारतीय महिला कबड्डी संघाची कविता सदस्य होती. कविता ही हरयाणामधील जिंद जिल्याची रहिवासी असून तिने आजपर्यंत ५ आंतरराष्ट्रीय पदके मिळवली आहेत. याबरोबरच तिने हरयाणाकडून राष्ट्रीय पातळीवर १७ पदके जिंकली आहेत. असे असूनही तिला आजतागायत सरकारी नोकरी मिळाली नव्हती.
Related Posts
कविताला २०१४ मध्ये २ कोटी रुपये इनाम मिळाला होता. मात्र राज्य सरकारडून तिला कोणतीही मदत अथवा नोकरी मिळाली नव्हती. आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूंना सरकारकडून अ श्रेणीची नोकरी दिली जाते. कविता मात्र सुवर्णपदक जिंकल्यावर चार वर्षे उलटून गेल्यावरही सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत होती. अखेरीस २०१८ मध्ये तिने याबाबत कोर्टात दाद मागितली.
हरयाणा सरकारच्या क्रीडा धोरणांतर्गत आपल्याला नोकरी मिळावी म्हणून कविताने अर्ज केला होता. हरयाणा सरकारने २०१७ मध्ये आपले क्रीडा धोरण बदलल्यानंतर खेळाडूंना पुन्हा एकदा नोकरीसाठी अर्ज करावा लागणार होता. कविताने याबाबत कोर्टात दाद मागितली होती. अखेरीस दोन वर्षे कोर्टात केस चालल्यानंतर आता हरयाणा सरकारने तिला नियुक्तीचे पत्र दिले आहे. आता क्रीडा विभागातच नोकरी मिळाल्याने राज्यात खेळाच्या प्रसारासाठी काम करणार असून ग्रामीण भागातील खेळाडूंना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे मत कविताने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.