मोठ्या भावाकडून अजयला खास भेट

A special gift to Ajay from his brother Amit

कबड्डीपटू आणि त्यांच्या यशोगाथा अनेकदा आपल्या वाचनात येतात.प्रत्येक कबड्डीपटूच्या यशात त्याच्या घरच्यांचा मोठा वाटा असतो. वेळोवेळी घरच्यांनी दिलेले प्रोत्साहन या यशात मोठी भूमिका बजावते.

भारताचा प्रसिद्ध कबड्डीपटू अजय ठाकूर याच्या यशातही त्याचा मोठा भाऊ अमित ठाकूर याचा मोठा वाटा आहे. स्वतः अजय याबाबत अनेकदा बोलला आहे.
आपल्या भावाच्या खंबीर पाठिंब्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो असे अजय सांगतो.

अजयचा हा भाऊ अमित वेळोवेळी अजयचे कौतुकही करत असतो. आता मात्र त्याने एक खास गोष्ट करून अजयचे कौतुक केले आहे. अमितने आपल्या छातीवर अजयच्या चेहऱ्याचा टॅटू करून घेतला आहे. अजयच्या चेहऱ्याखाली फिअरलेस म्हणजेच निडर अशा अर्थाचा शब्दही टॅटू केला आहे.

 

स्वतः अजयने आपल्या भावाचे फोटो इंस्टाग्रामवर टाकत ही गोष्ट चाहत्यांशी शेअर केली आहे. या पोस्टवर अनुप कुमार, बलदेव सिंग, रोहित राणा, दीपक हुडा, मनिंदर सिंग या भारताच्या आघाडीच्या कबड्डीपटूंनी कॉमेंट करून या अनोख्या बंधुप्रेमाचे कौतुक केले आहे.