पुणेरी पलटणच्या नितीन तोमरची ड्रीम टीम एकदा बघाच
A Look At Nitin Tomar’s Dream Team

प्रो कबड्डी लीगतर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘बियाँड द मॅट’ या कार्यक्रमातून आत्तापर्यंत अनेक खेळाडू चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात रविवारी (२५ ऑक्टोबर) पुणेरी पलटणचा खेळाडू नितीन तोमर उपस्थित होता. यावेळी त्याने अनेक विषयांवर चर्चा केली.
याबरोबरच प्रो कबड्डी लीगच्या इन्स्टाग्राम हँडलवरून लाईव्ह पार पडलेल्या या कार्यक्रमात नितीनने आपली कबड्डीची ड्रीम टीमही सांगितली. त्याने त्याच्या ड्रीम टीममध्ये स्वत:लाही स्थान दिले.
अशी आहे नितीनची ड्रीम टीम
मनजीत चिल्लर – राईट कव्हर आणि कर्णधार
सुरजित सिंग – लेफ्ट कव्हर
फझल अत्राचाली – राईट कॉर्नर
नितेश कुमार – लेफ्ट कॉर्नर
परदीप नरवाल – रेडर
पवन सेहरावत – रेडर
नितीन तोमर – रेडर
नितीनने २०१६ च्या विश्वचषकात मोक्याच्या वेळी डू ऑर डाय रेड करत भारताला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.