बीड परभणीच्या तरुण कबड्डी खेळाडूंना पर्वणी – दिग्गज करणार खास मार्गदर्शन

बीड आणि परभणी जिल्ह्यातील तरुण कबड्डी खेळाडूंसाठी पर्वणी चालून आली आहे. निमित्त आहे माननीय शरद पवार यांच्या वाढदिवसाचे. या निमित्ताने बीड जिल्ह्यातील शारदा कबड्डी अकादमी गेवराई यांच्या वतीने एक मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या सत्रात भारताचे माजी खेळाडू आणि दिग्गज शांताराम जाधव, अशोक शिंदे, राजू भावसार, गणेश शेट्टी, रवी करमरकर हे खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी मराठवाड्यातील प्रसिद्ध खेळाडू सचिन भोसले तसेच इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम ११ डिसेंबर २०२० रोजी दुपारी १२:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंनी उपस्थित राहून या सत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन शारदा अकादमीचे प्रशिक्षक तथा NIS प्रशिक्षक केतन गायकवाड यांनी केले आहे. खेळाडू त्यांना ९५२७३२६००६ या नंबरवर संपर्क करू शकतात.

परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने देखील ‘महाराष्ट्रातील कबड्डी, प्रसार आणि विकास’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. या परिसंवादात वर उल्लेख केलेले दिग्गज सहभागी होणार आहेत.या निमित्ताने खेळाडू तसेच कबड्डी क्षेत्राशी निगडित लोकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी मंगल पांडे, सुरेश वरपूडकर यांनी केले आहे.