दीपक नुसता मोठा खेळाडूच नाही तर मोठा माणूसही…

Deepak - not just a great player but also a great human being too

भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार दीपक हुडा हा आपल्या मैदानावरील कामगिरीने नेहमीच चर्चेत असतो. प्रो कबड्डी लीग मधील एक सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून दिपकचे नाव घेतले जाते. कबड्डीमधील योगदानासाठी भारत सरकारने नुकताच अर्जुन पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला आहे.

आता दिपकने आपण फक्त एक मोठा खेळाडूच नाही तर मोठा माणूसही आहोत हे दाखवून दिले आहे. दिपकचे पहिले कबड्डी गुरु जगमाल सिंग हरयाणामधील रिंधाना गावात कबड्डीचे प्रशिक्षण देतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डीचे धडे गिरवरणाऱ्या ६० खेळाडूंना दिपकने एक खास भेट दिली आहे. या खेळाडूंना दिपकने कबड्डी खेळण्यासाठी खास किट दिले आहेत. दिपकने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

“कबड्डी खेळाडूंना मदत करून या खेळाला आपल्या परीने काहीतरी परत देण्याची अशी कायम माझी इच्छा होती. आज हे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने मी एक पाऊल पुढे टाकले आहे” असे दिपकने या पोस्टमध्ये म्हटले आहे.