मेहनत अखेर कामाला आली! कबड्डीपटू दिपक हुडाला अर्जुन पुरस्कार जाहीर
The hard work finally paid off! Kabaddi player Deepak Hooda to receive the Arjuna Award

आज क्रीडा क्षेत्रातील यावर्षीच्या पुरस्कारांसाठी खेळाडूंची अंतिम निवड क्रीडा मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. यामध्ये कबड्डीपटू दीपक निवास हुडाला यावर्षीचा अर्जून पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याच्यासह अन्य क्रीडा प्रकारातील एकूण २७ खेळाडूंना हा पुरस्कार यावर्षी मिळणार आहे.
दीपकने भारताकडून २०१६ चा विश्वचषक तसेच २०१६ आणि २०१९ च्या दक्षिण आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. दुबईत २०१८ साली झालेल्या दुबई मास्टर्स स्पर्धेतही त्याने भारताकडून सुवर्णपदक मिळवले होते.
दीपक व्यतिरिक्त कबड्डी प्रशिक्षक कृष्ण कुमार हुडा यांना द्रोणाचार्य जीवनगौरव द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते पाचवे कबड्डी प्रशिक्षक असतील. याआधी ई राव, बलवान सिंग, सुनिल दबास आणि रामबीरसिंग खोकर यांना हा पुरस्कार मिळाला होता.
गुजरात फॉर्च्युन जायंट्सचे प्रशिक्षक मनप्रित सिंग यांना ध्यानचंद पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते केवळ दुसरे कबड्डी प्रशिक्षक आहेत. याआधी २००७ मध्ये समशेर सिंग यांना हा पुरस्कार मिळाला होता.
पुरस्कारासाठी निवड झालेल्या खेळाडूंना २९ ऑगस्ट रोजी पुरस्कार दिला जाईल. २९ ऑगस्ट हा दिवस मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी पुरस्कर वितरण सोहळा कोरोना व्हायरसमुळे ऑनलाईन होणार आहे.