हॅकर्सचा आणखी एका कबड्डी खेळाडूला झटका
Hackers attack another Kabaddi player

हॅकर्सने आता अजून एका कबड्डी खेळाडूला आपला झटका दाखवला आहे. यावेळी बेंगळुरु बुल्स संघाचा कर्णधार रोहित कुमार याचे फेसबुक पेज हॅक झाले आहे. स्वतः रोहितने याबाबत माहिती दिली आहे.
रोहितने आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत आपल्या चाहत्यांना याबाबत माहिती दिली. या स्टोरीमध्ये त्याने लिहिले आहे,
“सर्वांना नमस्कार. माझे अधिकृत फेसबुक पेज आणि अकाउंट हॅक झाले आहे. कृपया कोणाहीकडून आलेल्या कोणत्याही मेसेजला उत्तर देऊ नका.”
या स्टोरीनंतर त्याने अजून एक स्टोरी पोस्ट करत त्यात आपल्या फेसबुक पेजचा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. या स्क्रीनशॉट वर हॅकड असे लिहिले आहे.
रोहितच्या फेसबुक पेजवर काल एक पोस्ट करण्यात आली असून तिचे कॅप्शन, “अमेजिंग टेक्नोलॉजी” असे आहे. या पोस्टनंतर पेजवर कोणतीही पोस्ट दिसत नाही.
रोहितचे पेज हॅक झालेय म्हणजे नक्की काय झाले याबाबत अजून माहिती मिळू शकली नाही. याआधी श्रीकांत जाधव याचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले होते. या प्रकारात त्याला आपले अकाऊंट गमवावे लागले होते.त्याने आता नवे इन्स्टाग्राम अकाउंट काढले आहे.