आधी होती राज्य पातळीवरील कबड्डी खेळाडू, आता बनली थेट आयएएस अधिकारी

Formerly a state-level kabaddi player now has become an IAS officer

आग्रा जिल्ह्यातील नैनाणा जाट खेड्यातील नेहा बंधू हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत उज्वल यश मिळवले आहे. चोविस वर्षांच्या नेहाने या परीक्षेत भारतात १२१ वा क्रमांक मिळवला आहे.
दलित समाजातील नेहाने आयआयटी बनारसमधून पदवी अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. सध्या ती भारतीय रेल्वेच्या सेवेत आहे. याआधी २०१७ मध्ये तिने या परीक्षेत ९५४ वा क्रमांक मिळवला होता. त्यांनतर तिने एक वर्षाची रजा घेऊन परीक्षेची तयारी केली. विशेष म्हणजे नेहा ही एक राज्य पातळीवरील कबड्डी खेळाडू आहे.
“मी दलित समाजातील असले तरी मला शिक्षणाची संधी मिळाली म्हणून मी इथपर्यंत पोहोचू शकले. माझ्या समाजातील अनेक मुलींना ही संधी मिळत नाही. अशा मुलींना मला शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची आहे.”असे नेहाने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले.