कबड्डी खेळल्याबद्दल थेट जिल्हाधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आदेश
Playing Kabaddi costed them more than they thought
ओरिसा राज्यात गंजम जिल्ह्यातील १६ युवकांना कबड्डी खेळणे चांगलेच महागात पडले आहे. करोनामुळे असलेले निर्बंध मोडल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
राखी पौर्णिमेच्या दिवशी हे तरुण एकत्र आले होते. एकत्र आल्यावर त्यांनी कबड्डीचा सामना खेळला. या भागातील एका नागरिकाने या सामन्याचा फोटो काढून थेट जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिगापहांडी येथील तहसीलदारांना संबंधित युवकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.
या आदेशाला अनुसरून तहसिलदारांनी या १६ युवकांवर गुन्हा दाखल केल्याचे वृत्त ओरिसा पोस्टने दिले आहे.